पुणे (प्रतिनिधी) : पुणे येथे राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय कार्यक्षेत्रात नावलौकिक असलेल्या विविध संस्थांच्या माध्यमातून दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार- २०२२, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज, पेडगावचे सुपुत्र, श्री. दिपकराजे गणपतराव शिर्के यांना नुकताच प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यात दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड – २०२२, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य, पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य, ऑल इंडिया अँटी करुप्शन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले माजी सैनिक अधिकारी दिपकराजे गणपतराव शिर्के यांना “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी भारतीय सेनेत भरती होऊन २५ वर्ष देशसेवा करून निवृत्तीनंतर देखील स्वस्थ, शांत न बसता शंभुसेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राज्यभर समाजकार्य करत असलेले तर त्यांचे हेच निस्वार्थ अनोखे कार्य पाहून अनेक राजकीय पक्ष – पार्टी देखील आदर सन्मान देत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तर अष्टपैलू उल्लेखनीय कार्य विचारात घेऊन पक्षात थेट पवार साहेबांनीच मोठे मानाचे स्थान दिले. शंभुसेना संघटनेचे प्रमुख व माजी सैनिक अधिकारी दिपकराजे गणपतराव शिर्के हे सध्या सैनिक कल्याण समिती सचिव पदावर असून डिफेन्स करियर अकॅडमी, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, तसेच विविध व्यवसाय सांभाळत आहेत. काही काळ सैनिक फेडरेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदीही राहिलेले आहेत. राजे शिर्के यांना मानाचा पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून अभिनंदनासह कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या समर्थक व हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सदर पुरस्कार प्रदान कार्यक्रमा प्रसंगी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजे भोसले, प्रसिद्ध न्यूज अँकर,अभिनेत्री व समाजसेविका फरहान खान, प्रसिद्ध गायीका, अभिनेत्री केतकी माटेगावकर, सिनेअभिनेते श्री. राम प्रभुणे, लिज्जत पापड ग्रुपचे अध्यक्ष कोते सर, जिल्हा पोलिस उपअधीक्षक श्री. अनिल पवार, पोलीस निरीक्षक शामी पठाण, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे, पोलीस मित्र राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पठारे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश राठोड, कल्याणी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सुनीताताई मोडक, श्रीमंत राठोड, सैनिक सेलचे चंद्रकांत गायकवाड आणि चंद्रकांत ढेंबरे आदिंसह अनेक सामाजिक, सांस्कृतिक, चित्रपट व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.