पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या स्थापने नंतर लवकरच प्रदेश कार्यकारणी जाहीर करण्यात येईल त्यानंतर राज्यभर संघटन बांधणी दौऱ्याचे नियोजन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे नवनिर्वाचित “राज्यप्रमुख” तथा “प्रदेशाध्यक्ष” दिपक राजेशिर्के यांच्यासह प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा तथा संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संकल्पनेतून, थेट आशीर्वादाने व शुभहस्ते तसेच प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील साहेब, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेब, खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मंत्री महोदय, मा. आमदार, मा. खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलची” मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली.
देशाची संरक्षण सेवा करून निवृत्त झालेल्या व सर्व क्षेत्रात कौशल्य असणाऱ्या माजी सैनिकांना सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या दूरदृष्टीतून महत्त्वाचा निर्णय घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलची स्थापना करण्यात आली असून, आजी – माजी सैनिकांसह त्यांच्या शेतकरी कुटुंबासंदर्भात लवकरच अनेक हिताचे निर्णय होण्याच्या अपेक्षा असल्याने अवघ्या देशभरातील शेतकरी वर्गासह व आजी – माजी सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे…
त्याचाच एक भाग म्हणुन राज्य, प्रांत, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर पक्ष संघटना बांधणी करणे कामी तसेच त्यासंदर्भता स्थानिक ठिकाणी मदत, सहकार्य होण्या कामी राज्यभरातील राष्ट्रवादी पक्षाचे मा. आमदार, मा. खासदार , प्रदेश पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांना मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य कार्यालयातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व प्रदेश सरचिटणीस मा. शिवाजीराव गर्जे साहेबांनी पक्ष संघटन प्रोटोकॉल प्रमाणे संबंधित पदाधिकाऱ्यांना लिखित विनंती पत्र पाठवत दौऱ्यापूर्वी सूचित करण्यात आले आहे.
लवकरच सुरू होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या राज्यव्यापी संघटन बांधनी दौऱ्याची प्रमुख जबाबदारी “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे” नवनिर्वाचित “राज्यप्रमुख” तथा “प्रदेशाध्यक्ष” मा. दिपकराजे शिर्के साहेब व प्रदेश सरचिटणीस मा. बाबासाहेब जाधव साहेब यांच्यासह पार्टीचे अन्य सहकारी व प्रदेश पदाधिकाऱ्यांवर आहे..