पुणे, प्रतिनिधी : शांतिदूत परिवाराच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा शांतीदूत सेवारत्न पुरस्कार प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांना प्रदान करण्यात आला.
उद्योजक रामदास माने, पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, जीएसटी आयुक्त शिवकुमार साळुंखे, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांच्या हस्ते डॉ. कदम यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी शांतीदूत परिवार संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई जाधव, संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप. प्रशांत महाराज मोरे, प्राचार्य रामदास चौरे, गझल गायक भीमराव पांचाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रदीप कदम यांनी देशभरात अडीच हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल मंडळाचे वक्ते असून, चिखली येथील कॉनक्वेस्ट कॉलेजचे प्राचार्य आहेत. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने प्रदीप कदम प्रेरणादायी व्याख्याने देत आहेत.