पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील इंद्रायणी, पवना व मुळा या नद्यांच्या स्वच्छतेसाठी तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी करत असलेले उपक्रम हे विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक असल्याने प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना या संदर्भातील माहिती देण्यात यावी अशी अशी इच्छा उपायुक्तां समवेत विद्यार्थ्यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक विजय सोनवले यांनी व्यक्त केली स्टुडंस एज्युकेशन फाउंडेशन चिखली यांच्या माध्यमातून इंद्रायणी स्वच्छता उपक्रम नुकताच पार पडला या उपक्रमात सहभागी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क प्रभाग कार्यालयात पार पडला. यावेळी डॉ. प्रदीप ठेंगळ उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अजिंक्य येळे सहाय्यक आयुक्त क प्रभाग क्षेत्रिय कार्यालय, तानाजी दाते, स्टुडंट एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रा. विजय सोनावले आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. प्रदीप ठेंगळ म्हणाले की, स्टुडंट एज्युकेशन फाउंडेशन ने इंद्रायणी स्वच्छते संदर्भात जे काम हाती घेतले त्याबद्दल विजय सोनवले यांचे व त्यांच्या पत्नीचे मनापासून धन्यवाद. या चिमुकल्या हाताने एवढे मोठे आव्हानात्मक काम पेलले असून या चिमुकल्या हातांचे खरोखर कौतुक करावे इतके थोडेच आहे. स्वच्छतेचे संस्कार तसेच नदी सुधार प्रकल्प सारख्या एवढ्या मोठ्या प्रकल्पात संस्था सातत्याने काम करीत आहेत. खरंतर या दांपत्याने तसेच विद्यार्थ्यांना व काही नागरिकांना घेऊन स्वच्छ सर्वेक्षणाचा यज्ञ अखंड गेले दहा वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात तेवत ठेवला आहे यासाठी पालिकेतर्फे जेवढी मदत शक्य असेल तेवढी मदत आम्ही करू.

सहाय्यक आयुक्त क प्रभाग अजिंक्य येळे म्हणाले की, आफ्रुजा मुजुमदार सारख्या विद्यार्थिनींने अतिशय संवेदनशीलपणे इतक्या लहान वयात नदी सुधार प्रकल्पाविषयी माहिती मांडली तीने अतिशय सुचक अभ्यासपूर्वक व संवेदनशील विचार आपल्या भाषणातून मांडले हे अतिशय अनाकलनीय असून खरोखर तिचे कौतुक व त्यांच्या सरांचे सुद्धा कौतुक. उद्याच्या भारताचे भविष्य घडवणारी ही पिढी अतिशय चांगले काम करू शकते. तुम्ही सर्वांनी जे काम केले ते खरोखर अभिमानास्पद आहे खरंतर बाहेरच्या देशातील नद्या इतक्या सुंदर स्वच्छ असतात की आपण तेथील पाणी पिऊ शकतो आणि भारतात गंगेला खरं तर आपण माता मानतो तरीसुद्धा आपण नदीकडे दुर्लक्ष करतो व नदीला अक्षरश: दुर्गंधी करून टाकतो ही शोकांतिका आहे मात्र आपण नदी स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहात त्याबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे. आमच्याकडून तुम्हाला काही मदत हवी असेल त्या ती आम्ही पालिके तर्फे निश्चित करू तुमच्या सोबत आम्ही उभे राहून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये काम करू.
स्टुडंट्स एज्युकेशन सोशल फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक विजय सोनावले म्हणाले की एमआयडीसीतील ज्या कंपन्या सेवेच ट्रीटमेंट न करता नदीमध्ये पाणी सोडतात त्यांच्याकडे कारवाई केली जावी तसेच नदी सुधार प्रकल्प साठी जे काही देशातील उत्कृष्ट मॉडेल्स तांत्रिक यंत्रणा आहेत त्या निश्चित आपण इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा या नद्यांसाठी आपण निश्चित करू व आपलं शहर व आपली नदी स्वच्छ ठेवण्याचा आम्ही सर्वांसोबत , महानगरपालिका, शासनासोबत करूया निश्चितच सर्वजण मिळून आपण काम केले तर येणाऱ्या काळात नदीची दुरावस्था वाचवण्यात येईल.

यावेळी इंद्रायणी स्वच्छता मोहिमेत सहभागी घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. सहाय्यक अधिकारी क क्षेत्रीय कार्यालय आरोग्य कर्मचारी निलेश नलावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *