पुणे (प्रतिनिधी) : वाघोली पुणे येथे दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी माजी सैनिक कल्याण संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष, ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज, पेडगाव येथील धर्मवीरगडचे शंभुसेना प्रमुख दिपकराजे गणपतराव शिर्के तसेच सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे, डॉ. शितल मालुसरे, ECHS चे डायरेक्टर डॉ. कर्नल रणजित कटाकडे, कॅप्टन परशुराम शिंदे साहेब, सुभेदार श्रीमंत राठोड, सुभेदार चंद्रकांत गायकवाड, दुबे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वच प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन पर आपले विचार मांडले.
कार्यक्रमा दरम्यान सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, वर्धापन दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनिल सातव, सचिव आनंद गोसावी, उपाध्यक्ष मारुती कुटे , संघटक कल्याण लगड यांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. वर्धापन दिनास माजी सैनिकांसह शिव-शंभुभक्त,कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती होती. समारोपा नंतर.. जय हिंद, जय महाराष्ट्र..जय जवान, जय किसान चा जयघोष करून कार्यक्रमाची सांगता केली.