पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भक्तीशक्ती चौक निगडी ते दापोडी तसेच दापोडी ते भक्तीशक्ती चौक निगडी दरम्यान सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते सायकल फेरीचे झेंडा दाखवून सूरुवात करण्यात आली. त्यावेळी शहरवासीयांना संबोधित करताना ते बोलत होते. तसेच, पर्यावरणदिनानिमीत्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
भक्तीशक्ती चौक निगडी येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बापुसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, स्मार्ट सिटीच्या सचिव चित्रा पंवार, उपअभियंता सुनील पवार, अनिल सुर्यवंशी, संजय साळी, इकोपेडलर संस्था, अविरत श्रमदान संस्था आदींसह सायकल प्रेमी व पर्यावरण प्रेमी मोठया संख्येने सायकल फेरीमध्ये सहभागी झाले होते. सायकल फेरीमध्ये सहभागी झालेल्यांना पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
