पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच महानगरपालिकेचे लेखा विभागातील लिपिक- श्रीमती अनुष्का अधिकारी आणि त्यांचे सोसायटीतील बालचमू यांचे समावेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काळेवाडी, रहाटणी, पवना नगर येथील महानगरपालिकेचे उद्यानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. यावेळी बालचमूच्या या आगळ्या वेगळ्या कार्याचे कौतुक अनेक स्तरावर होऊ लागले. त्यांच्या या छोट्याशा कार्यक्रमाला मनापासून अभिवादन…
