पिंपरी :- दिनांक ०३ जून २०२२ रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी-चिंचवड, पुणे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या नियुक्त्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या हस्ते देण्यात आल्या.

माजी सैनिक श्री. बाबाजी रामभाऊ खामकर यांची पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष पदी, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष पदी सोहेल अहमद खान, शहर उपाध्यक्ष पदी संतोष गायकवाड, शहर सरचिटणीस पदी दत्ता साबळे, तर शहर चिटणीस पदी श्रीधर सोमवांशी यांची निवड करण्यात आली.

नियुक्ती नंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना.अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री दिपक गणपतराव शिर्के, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, प्रदेश उपाध्यक्ष पोपटराव पडवळ, प्रदेश संघटक कॅप्टन शेषराव काळवाघे, पश्चिम महाराष्ट्र संघटक कॅप्टन वसंत अजमाणे, प्रदेश सह-संघटक तातेराव मुंडे, माजी सैनिक चंद्रकांत ढेम्बरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष माननीय श्री अजित भाऊ गव्हाणे, मा. नगरसेवक मा.चंद्रकांत भाऊ वाळके, आमदार अण्णा बनसोडे, माजी शहराध्यक्ष व माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, माजी महापौर वैशाली घोडेकर त्याच बरोबर राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होते.

याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *