घरजाई माता जेष्ठ नागरिकांचा अभिष्टचिंतन सोहळा मा.नगरसेवक शांताराम बाप्पु भालेकर यांच्या संकल्पनेतून जेष्ठ नागरिक संघ यांच्या कार्यालय मध्ये साजरा करण्यात आला…
पिंपरी :- रुपीनगर तळवडे मधील घारजाई माता जेष्ठ नागरिक संघामध्ये जून महिन्यातील 50 ज्येष्ठ नागरिकांचा अभिष्टचिंतन सोहळा एकत्रितपणे साजरा करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी अध्यक्ष अरुण रामचंद्र वाळुंजकर उपाध्यक्ष गौतम बाबुराव मोकाशे उपाध्यक्ष बाबुराव सोमाजी गाडे सचिव बंडू रामकृष्ण राणे सहसचिव दत्तात्रय दादासाहेब भोसले सहखजिनदार दगडू बाबाजी मोरे कार्यवाहक जिजाबा पाटोळे सहकार्य वाहक पांडुरंग यशवंत गावडे सहकार्य वाहक विलास निवृती जाधव सहकार्य वाहक काशिनाथ शिंपी सदर कार्यक्रम सोहळ्याचे प्रस्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण वाळुंजकर यांनी केले.
सदर कार्यक्रमास शिरीष उत्तेकर, नंदू शेठ मोरे, गौतम भाऊ मोकाशे, मोहन आप्पा शेवाळे, गजानन वाघमोडे,सौ. शितलताई वर्णेकर महासंघाचे सचिव ढमाले साहेब इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं गौतम भाऊ मोकाशी यांनी आईवडिलांची सेवा व जेष्ठ नागरिकांची सेवा श्रावण बाळा प्रमाणे करावी असा प्रकारचा उपदेश दिला.या कार्यक्रमाप्रसंगी शांताराम बापू भालेकर यांनी मनोगत व्यक्त करत असताना अनेक ज्येष्ठ नागरिक हे आई वडिलान समान असून त्यांनी केलेल्या संस्काराचे पालन करून त्यांच्याप्रती आदर भाव असावा आणि ज्येष्ठ नागरिकांचा अभिष्टचिंतन सोहळा करण्याचा योग माझ्या नशीबी आला असे मी माझे भाग्य समजतो. एस डी भालेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिकांना बद्दल आदरयुक्त भावना असावी आणि ज्येष्ठ नागरिकांचा मान-सन्मान सातत्याने करण्यात यावा आणि त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा सातत्याने साजरा करण्यात यावा असे प्रतिपादन केले. या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी रामभाऊ दशरथ भालेकर, दत्तात्रय कुंभार, रुपीनागर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रमेश नामदेव भालेकर, किरण पाटील, केंब्रिज स्कूलचे संस्थापक धनंजय वर्णेकर सर स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, रामदास गवारे हनुमंत कलमुर्गे, खान साहेब स्वप्निल वाघमारे, रवी शेतसंधी कमलेश भालेकर, अक्षय रासकर बालाजी टेकाळे, आशिष मालुसरे सचिन गायकवाड, प्रदीप जैस्वाल, सूनिल आमणे, बाळासाहेब मिटे, विजय थिटे, मयूर बोडके, अभिजीत गिरी, दादा सातपुते, बाळासाहेब शंकर भालेकर,रमेश पाटोळे,ढोले साहेब उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी सौ.शितलताई वर्णेकर, सौ.वैशालीताई भालेकर सौ.सुलोचना भोज या महिला भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पि. चि.शहर- किरण पाटील यांनी केले.

