प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराजांना हेरायला सुरुवात केली आहे. भाजपच्या पिंपळे गुरव येथील विद्यमान नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती राजू लोखंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणून याची सुरुवात केली आहे.

राजू लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड विभागाचे माजी अध्यक्ष विजयआण्णा जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती अतूल शितोळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *