पुणे : एक लाख अठरा हजार लाच प्रकरणी अटकेत असलेले स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज कोर्टाने आज दुपारी मंजूर केला असून त्यांची सुटका झाली आहे. मात्र चार कर्मचाऱ्यांना 25 तारखेपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जाहिरात होर्डिंगचा विषय मंजूर करण्यासाठी 6 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एजन्सी चालकाच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे करण्यात आली होती. तक्रारी अर्जावरून बुधवार दि 18 ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली. त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी आरोपींना कोर्टात नेल्यानंतर दि.23 म्हणजे आज दुपारी 1 च्या दरम्यान पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने आरोपी व फिर्यादी दोन्ही वकिलांचे म्हणणे ऐकून नितीन लांडगे यांची सुटका केली.
तर ज्ञानेश्वर पिंगळे, विजय चावरीया, राजेंद्र शिंदे व अरविंद कांबळे यांना 25 तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे. शिवाजीनगर कोर्टात गर्दी!लाच प्रकरणी अटकेत असलेले नितीन लांडगे व कर्मचाऱ्यांना अटक करून शिवाजीनगर येथील विशेष कोर्टात हजर करण्यात आले.
त्यानंतर 21 तारखेलाही पुन्हा शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले.त्यादिवशी पिंपरी चिंचवड शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र त्यादिवशी कोर्टाने जामीन अर्ज नामंजूर केला होता.आज दुपारी 1 च्या नंतर पुन्हा स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे व इतर चार कर्मचाऱ्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे 300 पेक्षा जास्त कार्यकर्ते तसेच भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *