इंद्रायणीनगर | प्रतिनिधी :- पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये यंदाची निवडणूक केवळ राजकीय लढाई नसून ती झोपडपट्टीतील लाखो नागरिकांच्या जगण्याच्या हक्काची लढाई बनली आहे. बालाजीनगर आणि परिसरातील नागरिक आजही पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि पक्क्या घरासाठी झगडत आहेत. अशा वेळी या भागातून उभी राहिलेली, संघर्षातून घडलेली उमेदवार म्हणजे सरिता योगेश कुऱ्हाडे–गोरडे.

सरिता ताई या शंकर विठ्ठल कुऱ्हाडे यांच्या सुनबाई असून त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक ८ मधून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. शंकर कुऱ्हाडे यांचे आयुष्य म्हणजे झोपडपट्टीतील प्रत्येक कष्टकऱ्याचे प्रतिबिंब आहे. अवघ्या दहा वर्षांचे असताना ते बालाजीनगर झोपडपट्टीत राहायला आले.

बालाजीनगर मध्ये त्यांचे संपूर्ण बालपण गेले. तेथील चिखल, गल्ली, नाले, अपुऱ्या आरोग्य सुविधा, घाणेरडे पाणी – हे सगळे त्यांनी स्वतः अनुभवले आहे. त्यामुळेच आज ते या भागातील नागरिकांच्या वेदना केवळ समजून घेत नाहीत, तर त्या स्वतःच्या वेदना म्हणून जगतात.
शंकर कुऱ्हाडे सांगतात,
“बालाजीनगर ही फक्त झोपडपट्टी म्हणून ओळखली जाऊ नये, तर ती स्मार्ट बालाजीनगर म्हणून ओळखली जावी, हे माझे स्वप्न आहे. झोपडपट्टीतील लोकांनाही चांगली घरे, गार्डन आणि स्वच्छ, परिसर आणि आरोग्यदायी वातावरण मिळाले पाहिजे.”

आजही बालाजीनगर मधील अनेक कुटुंबांना स्वच्छ पाणी नियमित मिळत नाही. अनेक ठिकाणी उघडे नाले, कचऱ्याचे ढीग, डासांचा प्रादुर्भाव आणि वारंवार पसरणारे आजार हे वास्तव आहे. सरकारी योजना फक्त कागदावर राहतात, प्रत्यक्षात लाभ गरिबांपर्यंत पोहोचत नाही. या सगळ्याच्या विरोधात शंकर कुऱ्हाडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वैयक्तिक पातळीवर लोकांची कामे करून विश्वास मिळवला आहे. रेशन कार्ड, पाणी कनेक्शन, शौचालय, आरोग्य शिबिरे, घरकुल योजना – अशा असंख्य विषयांवर त्यांनी झोपडपट्टीवासीयांसाठी संघर्ष केला आहे.

याच संघर्षाची पुढची पिढी म्हणजे सरिता योगेश कुऱ्हाडे–गोरडे. त्या या प्रभागातून क सर्वसाधारण गटाच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत. त्या केवळ उमेदवार नसून, झोपडपट्टीतील महिलांच्या, तरुणांच्या आणि कष्टकरी कुटुंबांच्या आशेचे प्रतीक आहेत.

शंकर कुऱ्हाडे स्पष्ट शब्दांत सांगतात,
“जर सत्ता मिळाली तर लोकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवता येतील. म्हणूनच माझी सून सरिता योगेश कुऱ्हाडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे.”

बालाजीनगर झोपडपट्टीत शंकर कुऱ्हाडे यांचे भक्कम वर्चस्व आहे. लोक त्यांच्याकडे ‘आपला माणूस’ आणि ‘ हक्काचा माणूस” म्हणून पाहतात. आज हीच विश्वासाची शिदोरी सरिता ताईंना मिळत आहे.

प्रभाग ८ मध्ये विकास, सन्मान आणि हक्कांची लढाई उभी राहिली असून त्याचे नेतृत्व सरिता कुऱ्हाडे–गोरडे करत आहेत.
ही निवडणूक केवळ उमेदवार निवडण्याची नाही, तर
“झोपडपट्टीतून स्मार्ट शहराकडे जाण्याची” निर्णायक पायरी ठरणार आहे. बालाजीनगरच्या प्रत्येक घरात आशेचा दिवा पेटवण्यासाठी,
सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांना भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *