भाजप म्हणजे सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक न्यायाला प्राधान्य – भाजप उमेदवारांचा निर्धार

ताथवडे, ११ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांचा पाठिंबा वाढत असून, उमेदवार देखील केवळ विकासाच्या मुद्द्यांवर नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत.

प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल तानाजी कलाटे, कुणाल वाव्हळकर, रेश्मा चेतन भुजबळ, श्रुती राम वाकडकर यांचा वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरात प्रचार सुरु आहे.

सध्या प्रभाग क्रमांक २५ (वाकड, ताथवडे, पुनावळे) परिसरात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. पदयात्रा, घराघरात भेटी, नागरिक संवाद, सभा आणि बैठकींच्या माध्यमातून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट जनतेपर्यंत पोहोचत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासकामांची माहिती, भविष्यातील योजनांचा आराखडा आणि स्थानिक प्रश्नांवर दिले जाणारे ठोस उपाय नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. नागरिकांकडूनही या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भाजपच्या नेतृत्वावर वाढता विश्वास आणि समर्थन स्पष्टपणे दिसून येत आहे.

राहुल कलाटे म्हणाले,
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि विशेषतः पुणे–पिंपरी चिंचवड विभागात विकासाला वेगवान दिशा दिली गेली आहे. पायाभूत सुविधांपासून महानगर विभागातील रस्ते, वाहतूक, जलपुरवठा ते मोठ्या विकास आराखड्यांपर्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. येणाऱ्या काळात देखील वाहतूक सुगमता, मेट्रो विस्तार, जल व्यवस्थापन प्रकल्प व इतर मोठ्या योजनांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे, ज्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुधारत आहे. प्रभागात देखील या विकासाच्या कामांनी सकारात्मक बदल घडवून आणले असून, भाजपच्या नेतृत्वाने विकासाचं स्वप्न सत्यात उतरवण्याचा मार्ग सुगम केला आहे.”

कुणाल वाव्हळकर म्हणाले,
“भाजप सरकारने प्रत्येक समाजघटकासाठी स्वतंत्र योजना, थेट लाभ आणि समान संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अनुसूचित जाती, ओबीसी, मराठा, आदिवासी, अल्पसंख्याक – कुठलाही समाज मागे राहिलेला नाही. प्रभाग २५ मध्ये राहुल कलाटे यांनी नगरसेवक म्हणून सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकास, न्याय आणि समान प्रतिनिधित्वावर विश्वास ठेवणारे नेतृत्व म्हणून राहुल दादा कलाटे प्रभागाला परिचित आहेत.”

रेश्मा भुजबळ म्हणाल्या,
“सध्या प्रभाग २५ मधील सोसायट्यांमध्ये भाजपच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून सर्वसामान्यांना थेट लाभ मिळालेला असून, विशेषतः लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. या सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राहुल दादा कलाटे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांच्या कामांमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला असून, नागरिकांचा भाजपवरचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे.”

श्रुती वाकडकर म्हणाल्या,
“वाकड–ताथवडे–पुनावळे परिसरात मोठ्या प्रमाणावर आयटी कर्मचारी आणि तरुण वर्ग राहतो. त्यांच्या गरजा ओळखून खेळाची मैदाने, जॉगिंग ट्रॅक, फिटनेस सुविधा, वाहतूक सुधारणा आणि सुरक्षिततेसाठी राहुल कलाटे यांनी महत्त्वाची कामे केली आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा केवळ राजकीय नेते म्हणून नाही, तर विकासाभिमुख आणि तरुणांचा विचार करणारे लोकप्रतिनिधी म्हणून आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राहुल कलाटे यांच्यावर नागरिकांचा ठाम विश्वास आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *