मनपा जागांवर मनपाच्या सीबीएससी किंवा स्टेट बोर्ड च्या इंग्रजी शाळा सुरू करण्यात याव्यात
पिंपरी दि.१२, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक व शैक्षणिक आरक्षणाच्या मौल्यवान जागा या खाजगी संस्थांना देण्याबाबत काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे.
याबाबत आज काँग्रेसचे शिष्ट मंडळ महापौर रवी लांडगे यांना भेटले त्यांनी पुनावळे परिसरातील शैक्षणिक आरक्षणाचा भूखंड मौजे पुनावळे गाव सर्वे नंबर 38, 44 पै. आरक्षण क्रमांक 4/57 ही जागा खाजगी संस्थेला देण्याचा सुरू असलेला प्रयत्न हा जनविरोधी असल्याचे सांगत या विषयाला रद्द करण्याबाबतची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत माहिती देताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले, “पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने वाढत असताना नागरिकांसाठी मैदानी सार्वजनिक शाळा उद्याने आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज असताना सार्वजनिक जमिनी खाजगी संस्थांना घशात घालण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे, अशा ठिकाणी नागरिक गरजा नुसार महानगरपालिका कडून सीबीएससी शाळा किंवा स्टेट बोर्ड च्या इंग्रजी शाळा सुरू करणे गरजेचे असताना मनपाची जागा खाजगी संस्थांना देऊन खाजगी संस्थेचे नफा धोरण साधण्यासाठी मनपाच्या जागांचा उपयोग करणे गैर आहे याला आमचा तीव्र विरोध आहे”.
काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस स्वप्निल बनसोडे, काँग्रेसचे माजी सरचिटणीस हिराचंद जाधव, हरीश डोळस, जितेंद्र छाबडा आदी उपस्थित होते.
