पिंपरी:- टायटॅनिक या इतिहास प्रसिद्ध जहाजाच्या संदर्भात माहिती देणारे व मनोरंजन करणार्यी प्रदर्शनास पिंपरी चिंचवडकर यांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रावेत मुकाई चौकात साधारणता गेली महिनाभर चालू असलेल्या या प्रदर्शनातून आबाला वृद्धा टायटॅनिक बद्दलचा इतिहास जाणून घेतला त्याचबरोबर येथे उभारलेल्या सेटवर तसेच टायटॅनिक मधील अनेक व्यक्तींचे उभे केलेल्या मनोऱ्या सोबत नागरिकांनी आपली छायाचित्र काढली. एका आगळ्यावेगळ्या विषयावर सादर करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देत अशाच प्रकारची प्रदर्शने आयोजित करण्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली.
लहान मुलांची तसेच थोरामोठ्यांची ही जिज्ञासा वाढवणारे ज्ञान, कुतूहल आणि मनोरंजनाचा अनोखा संगम असलेल्या टायटॅनिक प्रदर्शन मुकाई चौक रावेत येथे उभारण्यात आले. हे प्रदर्शन आता 22 नोव्हेंबर पर्यंत खुले राहणार आहे. केवळ दहा-पंधरा दिवसच हे प्रदर्शन पिंपरी चिंचवड शहरात असल्याने अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती प्रदर्शनाचे संचालक सुदेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
टायटॅनिक हा जगभरातील प्रत्येकाचाच अतिशय कुतूहलाचा विषय आहे या विषयावर निघालेला चित्रपट देखील अतिशय लोकप्रिय ठरला. या चित्रपटातून टायटॅनिक जहाजाच्या अपघाताची आणि तत्कालीन परिस्थितीचे अवलोकन प्रेक्षकांना करता आले असले तरी या टायटॅनिक चा इतिहास मात्र तितकासा कोणाला ज्ञात नाही.
डी जे एम्युजमेंट या कंपनीने या टायटॅनिक जहाजाचा अपूर्व देखावा पिंपरी चिंचवड मधील लोकांसाठी उभा केला. देखाव्यात प्रत्यक्ष जहाजात वावरल्याचा अनुभव जिज्ञासा न घेता आला आहे.
टायटॅनिक हे जहाज कोणत्या कंपनीने बनवले कोणत्या वर्षी ते बनवण्यास घेतले केव्हा हे जहाज बनवून पूर्ण झाले त्याची पहिली सफर केव्हा झाली? हे जहाज कशाप्रकारे होते या कंपनीचे मालक कोण होते तसेच जहाजाचे कॅप्टन कोण होते याबाबतची सविस्तर माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना देण्यात येत आहे.
या अभूतपूर्व ज्ञानरंजनाबरबरच या प्रदर्शनात हॅण्डलूम, हँडीक्राफ्ट, विविध प्रकारची खेळणी, पुस्तके, फूड स्टॉल अशा विविध प्रकारचे 35 स्टॉल्स या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

याचबरोबर लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या राइड्स उपलब्ध करून दिले आहेत जेणेकरून ज्ञान कुतूहल यासोबतच मनोरंजनाचा खजिना या अनोख्या टायटॅनिक प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुकाई चौक येथे अतिशय मध्यवर्ती ठिकाणी भव्य अशा स्वरूपात उभारलेले हे प्रदर्शन पिंपरी चिंचवड करा साठी अविस्मरणीय अशी भेट ठरणार आहे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंगची ही भव्य उपलब्धता येथे करून दिले आहे.
