पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रेम आणि आपुलकीचा सण. याच सणाचे औचित्य साधून सम्यक स्वयंसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड डिजिटल पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांना दिवाळीनिमित्त स्नेहभेट देण्यात आली. या उपक्रमामुळे पत्रकार बांधवांची दिवाळी गोड झाली असून उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले पत्रकार समाजातील विविध घडामोडी, प्रश्न आणि जनतेच्या समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. अशा पत्रकार बांधवांप्रती आदर आणि स्नेह व्यक्त करण्याच्या भावनेतून राम बनसोडे यांनी दिवाळीच्या निमित्ताने हा उपक्रम राबविला.

समाजातील विविध घटकांमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, सण-उत्सवांच्या माध्यमातून आनंदाची देवाणघेवाण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे यावेळी दिसून आले. सामाजिक संस्थांनी समाजातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपावी, हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.

या वेळी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, बाबू कांबळे, संतलाल यादव, निलेश सायंकर, बद्रीनारायण घुगे, श्याम सोनवणे, दिनेश दुधाळे, शहनाज कुरणे, श्रद्धा प्रभुणे, उमेश सणस, उमेश पाटील, गौरव साळुंखे आणि सचिन सोनवणे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

सम्यक स्वयंसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे यांच्या या स्नेहपूर्ण उपक्रमाचे उपस्थित पत्रकारांनी स्वागत केले. दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेत पत्रकार बांधवांशी आपुलकीचे नाते जपण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी आनंददायी ठरला.

फोटो कॅप्शन : सम्यक स्वयंसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड डिजिटल पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांना दिवाळीनिमित्त स्नेहभेट देण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के यांच्यासह उपस्थित पत्रकार बांधव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *