पिंपरी :- नुकत्याच भूतान येथे 7 जून ते 10 जून पर्यंत पार पडलेल्या एशियन सीनियर आट्टयापाट्या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक मिळाले आहे.

भारतीय संघामध्ये निगडी, प्राधिकरण येथील 22 वर्षीय तरुण खेळाडू धनराज गणेश राऊत याचा समावेश होता. धनराज राऊत याला सुरुवातीपासूनच खेळाची आवड होती. तो न्यानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या क्रीडाकूलचा माजी विद्यार्थी आहे. सध्या तो इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे civil शाखेच्या पदवीचे शिक्षण घेत आहे.

त्याठिकाणी देखील त्याने कॉलेज तर्फे फुटबॉल, hollyबॉल,
वॉटरपोलो अश्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन कॉलेजला पुरस्कार मिळवुन दिलेले आहेत. तसेच कॉलेज मध्ये देखील यावर्षीच्या जनरल सेक्रेटरी पदावर त्याची निवड झालेली आहे

नुकतेच त्याने ऑक्टोबर 25 मध्ये कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय आट्टयापाट्या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये देखील महाराष्ट्राच्या संघाला सुवर्णपदक मिळवून दिलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *