सुभेदार नीरज चोप्राचे सैनिक फेडरेशन सह शंभुसेने कडून कौतुक….
पुणे (प्रतिनिधि) : भारतीय सैन्यदलात देशसेवा करत असतानाच ऑलिम्पिक स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय भालाफेकपटू ( रोड मराठा) सुभेदार नीरज चोप्राच्या भव्यदिव्य उत्कृष्ठ कार्याबद्दल सैनिक फेडरेशन व शंभुसेना संघटनेने अभिनदंन केले असुन, अखेर भारतीय लष्करातील सैनिकानेच सुवर्ण पदक जिंकत हिंदुस्थानची आनं..बानं..आनं शानं..राखली आल्याचे अभिमानास्पद वक्तव्य सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व शंभुसेना प्रमुख दिपक राजे शिर्के यांनी केले आहे.
गोल्डमेडल विजेता नीरज यांचा जन्म हरीयाणामधील पानिपत येथील खांदरा गावामधील एका शेतकरी कुटुंबात झाला असुन सध्या ते लष्करात राजपूताना रायफल्सच्या तुकडीमध्ये सुभेदार म्हणून भारत मातेची सेवा करत आहेत. शनिवारी ऑलिम्पिकमधील भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. ट्रॅक आणि फिल्ड गेम्समधील भारताचं हे मागील १०० वर्षांमधील पहिलं पदक ठरलं आहे.
भारतीय लष्कराकडून कौतुक म्हणून एक खास भेट मिळण्याची शक्यता असुन नीरजला बढती दिली जाणार असल्याचं लष्कराच्या सुत्रांनी म्हटलं आहे. नीरजची ऑलिम्पिकमधील कामगिरी पाहून नियमांनुसार त्याला प्रमोशन मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी , संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण दलांनी शनिवारी निरजने पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असतानाच सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, ब्रिगेडियर खा. सुधीर सावंत , सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, शंभुसेना प्रमुख दिपक राजे शिर्के व कार्यध्याक्ष नारायण अंकुशे यांनी ही अभिनदंन केले आहे.