पुणे (प्रतिनिधि) : सरडे ता. फलटण जि. सातारा येथील प्रवीण रमेश जाधव हा तरुण गरीबीतून शिक्षण घेऊन भारतीय सैन्यात भरती झाला तसेच टोकियो ऑलिम्पिक तिरंदाजी स्पर्धेत पात्रही ठरला तरी देखील अशा देशभक्त सैनिक खेलाडुच्या कुटुंबाला सरडे गावात घर बांधण्याच्या कारणावरून गावगुंडाकडून धमक्या देण्यात येत आहे. प्रवीणचे घर जेसीबीने पाडून टाकण्याची धमकी दिली आहे. प्रवीणचे वडील रमेश आणि आई हे दोघेही मोल मजुरी करतात. प्रवीण सैन्यदलात असून जमेल तसे पैसे आई-वडिलांना पाठवत आहे. गावगुंडाकडून सततच्या धमक्या आणि दमदाटी प्रकारामुळे त्याचे कुटुंब जेरीस आले आहे. त्यामुळे या कुटुंबाने सातारा जिल्हा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा खेळाडू सैनीकास साधा राहण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण होत असेल, लोकं धमकी देत असतील तर ही लाजीरवाणी व खेदाची बाब म्हणावी लागेल प्रविणचे मूलभूत प्रश्न लवकरात लवकरात स्थानिक नेत्यांसह प्रशासनाने सोडवले नाही तर सैनिक फेडरेशन व शंभुसेना संघटनेला लक्ष घालावे लागेल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे…
जय हिंद ..जय जवान…जय किसान…जय शंभुराजे…