पिंपरी :- अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळ माफियांच्या विरोधात सुरू केलेली कारवाई त्यातून कोट्यावधीची माफियांचे होत असलेले नुकसान त्यामुळे श्री मुंडे यांच्या जीवातास निर्माण झालेला गंभीर धोका त्यामुळे श्री मुंडे यांना (झेड प्लस ) Z सुरक्षा तातडीने प्रदान करण्यात यावी असे सामाजीक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी कळविले.

तसेच ते म्हणाले गोपनीय सूत्रांकडून मला विश्वसनीयरीत्या समजले आहे की, अन्न आणि औषध उद्योगातील भ्रष्ट माफियांच्या विरोधात श्री तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएच्या कठोर कारवाईचा अन्न व औषध भेसळ माफियांच्या कारभाराला मोठा फटका बसला आहे. त्यातून या माफियांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊन अन्न व औषध भेसळीला बऱ्यापैकी प्रतिबंध बसला आहे.
त्यामुळे श्री तुकाराम मुंडे यांना कायमस्वरूपी संपवण्यासाठी अंडरवर्ल्ड टोळ्यांना २५ कोटी रुपयांचे कंत्राट (सुपारी) दिल्या असल्याचे समजले आहे.

म्हणून मारूती भापकर यांनी व महाराष्ट्रातील नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री यांना विनंती अर्ज म्हटले की, आयुक्त तुकाराम मुंडे यांना तात्काळ ‘झेड प्लस’ सुरक्षा प्रदान करावी आणि आपल्या राज्यातील एक प्रामाणिक व कर्तृत्ववान आयएएस अधिकाऱ्याच्या प्राणांचे रक्षण करावे.

जर तुकाराम मुंडे सारख्या प्रामाणिक कर्तुत्ववान व डॅशिंग अधिकाऱ्याला वेळेत झेड प्लस सुरक्षा पुरवली नाही. व त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला तर आपल्या गृह खात्याच्या कारभारावर कायमस्वरूपी मोठा कलंक लागू शकतो. त्यामुळे आपण तातडीने तुकाराम मुंढे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी असे सामाजीक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी कळविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *