मुंबई (प्रतिनिधी) : दि १४ फेब्रुवारी छावा हिंदी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आणि उत्स्फुर्तपणे चालतही परंतु त्यात छत्रपतींचे जवळील नातेवाईक असलेले व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मातब्बर मराठा राजेशिर्के घराण्याने क्रूर औरंगजेबशी मिळून फितूरी केल्याचे दाखवत स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के व त्यांचेच काका कान्होजीराजे शिर्के यांचे प्रमुख खलनायक पात्र रंगवले असल्याने संबंधित वंशज घराण्यासह समस्त शिर्के परिवारांची बदनामी झाली असून, तशी लेखी तक्रार दाखल केल्यानंतरही पुन्हा सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे चित्रपट सेन्सॉर बोर्डचे चेअरमन प्रसन जोशी तसेच सीईओ यांच्या सोबत दि. ५ मार्च रोजी बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाली.

झालेल्या बैठकीत राजेशिर्के वंशज घराण्याच्या वतीने दिलेल्या तक्रार अर्जानुसार व अनेक ऐतिहासिक समकालिन पुरावे, कागदपत्रे, महत्वाचे दस्तावेज, प्रत्यक्ष वंशज घराणे उपस्थित असणे आदि वास्तव पुराव्यानिशी समोरा समोर सकारात्मात चर्चा झाली. यावर सेन्सॉर बोर्डाने आमची चुक झाल्याचे कबुल करत, आम्ही संबंधित दिग्दर्शक, निर्माता यांना तशा सूचना करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. वादग्रस्त चित्रपटा संदर्भात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनाही राजेशिर्के यांनी तक्रार अर्ज व निवेदन दिले आहे.

यावेळी मुळ शृंगारपुरकर परंतु १६८९ साली घडलेल्या ऐतिहासिक गुप्त गनिमी काव्यानुसार किल्ले बहादुरगड पर्यंत छत्रपती संभाजीराजेंना वाचविण्यासाठी आलेले घराणे म्हणजे महाराणी येसुबाई, श्रीमंत पिलाजीराजे शिर्के, श्रीमंत गणोजीराजे शिर्के यांच्या घराण्याचे वंशज दिपकराजे शिर्के, लक्ष्मीकांत राजे शिर्के यांच्यासह भूषणराजे शिर्के, वकिल सचिनराजे शिर्के साहेब, चेतनराजे शिर्के, भारतराजे शिर्के, नवनाथ राजे शिर्के, कुमार पवार आदि मंडळी, समस्त शिव- शंभुभक्त व मराठा बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *