पिंपरी :- घे भरारीचे भव्य प्रदर्शन पिंपरी चिंचवड आकुर्डी येथे आयोजित केलेले असून. रक्षाबंधन स्पेशल हे प्रदर्शन दि.२५, २६, आणी २७ ॲागस्ट दरम्यान हे प्रदर्शन सिजन बॅक्वेट हॅाल, मुंबई पुणे हायवे, काळभोरनगर, चिंचवड येथे सरु आहे, आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ या वेळात खुले आहे.

तीन दिवसीय ह्या प्रदर्शनात विविध व्यावसायिक व महिलांनी भाग घेतला आहे. यामध्ये उत्तमोत्तम दागिने, कपडे, परफुम्स, कुर्ती, पर्सेस, हातमागाच्या वस्तू, पादत्राणे, कलाकुसरीच्या वस्तू, साबणे, तांब्याच्या वस्तू, हस्तकलेच्या अनेक वस्तू ,पिशव्या, टेराकोटा वस्तू ,खाद्यपदार्थ असे अनेक स्टॉल येथे बघायला मिळतील. त्याचप्रमाणे चमचमीत पदार्थाची मेजवानी येथे आहे. त्यामुळे चोखंदळ ग्राहकांना ह्या प्रदर्शनात विविध व्हरायटी अनूभवता येणार आहेत. मागील दोन दिवसात नागरिकांचा विशेष करुन महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.

हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व महीला उद्योजक तथा नागरिकांनी आवूर्जन घे भरारीच्या प्रदर्शनास भेट द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *