हर घर तिरंगा अभियानंतर्गत शहर भाजपाच्या वतीने पदयात्रा व शोभायात्रा

पिंपरी :  भारतमाता की जय, वंदे मातरमचा टिपेला पोहोचलेला जयघोष, स्वातंत्र्यवीरांची वेषभूषा करुन शोभारथावर आरुढ झालेले चिमुरडे, मोठ्या संख्येने उत्साहात हाती तिरंगा घेवून सहभागी झालेले नागरीक यांच्या उपस्थितीत पदयात्रा व शोभायात्रा काढण्यात आल्या.
यावेळी बोलताना भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आलेल्या शोभायात्रा, पदयात्रांना नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे. हर घर तिरंगा, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत जनतेत राष्ट्रीय व राष्ट्रप्रेमाची भावना दृढ झाली आहे. भारत जागतिक पातळीवर प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून त्याचा जनतेत असणारा आनंद या उपक्रमांत दिसून येत आहे.

दरम्यान,  मा.स्थायी समिती सभापती श्री.राजेंद्र राजापुरे, श्री.अंबरनाथ कांबळे, मा.नगरसेविका सौ.माधवीताई राजापुरे, सामाजिक कार्यकर्ते श्री.सखाराम रेडेकर, श्री.मनोज मारकड, श्री.सुर्यकांत गोफणे, श्री.सुनील कोकाटे, श्री.भाऊसाहेब जाधव, श्री.राहुल कोंढरे, श्री.अनिल जाधव, श्री.किरण शिंदे,  श्री.संजय मराठे, श्री.संदीपान सामसे, श्री.भेंडे काका तसेच नवी सांगवी परिसरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मास्टरमाइंड विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *