पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमांतर्गत ग.दि. माडगूळकर सभागृह, आकुर्डी येथे स्वातंत्र्यसैनिक, शहीद कुटूंबियांचा तसेच आजी- माजी सैनिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला तसेच क्रांतीकारकांच्या माहितीसह शेकडो फोटोंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आयुक्त शेखर सिंह, तसेच लेफ्टनंट कर्नल मिथिलेश सिंग सेना मेडल, कॅप्टन हरी ओम सेना मेडल, 330 ब्रिगेड औंध व कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग दापोडीचे डेप्युटी कमांडंट अशोक संकला, एन डी आर एफ, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे सेना मेडल, अग्निशामक दलाचे इंगोले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल माजी नगरसदस्य नामदेव ढाके, उपायुक्त रविकिरण घोडके, मिनीनाथ दंडवते, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
