अ.नगर :- अ.नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव, तालुका श्रीगोंदा येथील ऐतिहासिक किल्ले पेडगाव वरील असणाऱ्या स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी महाराजांच्या “शौर्यस्थळास” राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या वतीने मानवंदना देऊन अर्थान विनम्र अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित “राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रा” स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी व संरक्षण मंत्री मा.शरदचंद्र जी पवार साहेबांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील साहेब, विरोधी पक्षनेते मा.अजितदादा पवार साहेब,खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली “राष्ट्रवादी राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रा” सध्या अवघ्या महाराष्ट्रभर ३६ जिल्ह्यात प्रबोधनाचा उद्देश डोळ्यासमोर पुणे येथून दौऱ्यावर मार्गस्थ झाली आहे.

प्रबोधन यात्रेच्या नियोजित वेळापत्रकानुसार नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका दौऱ्यावर असताना ऐतिहासिक पेडगाव किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या “शौर्यस्थळास” सैनिकी पद्धतीने मानवंदना देऊन (अभिवादन करून ) छत्रपती संभाजी नगरकडे (औरांगाबाद) मार्गस्थ झाली.
याप्रसंगी पेडगावचे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. दिपकराजे गणपतराव शिर्के साहेब, प्रसिद्ध शाहू महाराज व्याख्याते व मुंबई उच्च न्यायालयाचे सिनियर मेडियटर ॲड. संभाजीराव मोहिते साहेब, राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव साहेब यांची प्रमुख उपस्थित होती. तसेच प्रदेश संघटक कॅप्टन वसंत अजमाने, प्रदेश चिटणीस श्रीमंत राठोड, शंभुसेनेचे लक्ष्मीकांत राजे शिर्के, लोहगाव विभाग प्रमुख चंद्रकांत गायकवाड, प्रदेश कार्यकारणी सदस्य चंद्रकांत ढेंबरे, शंभुसेनेचे राज्य संपर्क प्रमुख श्यामजी देशकर, पेडगावचे माजी उपसरपंच देविदास काका शिर्के, संदीप देसाई, शाहजी जाधव, कॅप्टन विष्णू कोरे, गुंदप्पा साहेब, शिरीष पवार साहेब, राष्ट्रवादी महिला सैनिक विंगच्या सौ.राठोड मॅडम, यांच्यासह अन्य पदाधिकारी, शंभूभक्त मंडळी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जोरदार जयघोष करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *