राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींकडून राज्यप्रमुख दिपकराजे शिर्के यांचे कौतुक…
सांगली (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीत राज्यभर निर्माण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राज्यभर सुरू असलेले पक्षकार्य जोरदार व कौतुकास्पद असल्याचे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी सैनिक सेलचे राज्यप्रमुख / प्रदेशाध्यक्ष दिपकराजे गणपतराव शिर्के यांच्या घौडदौडीचे कौतुक केले.
१७ जानेवारी रोजी लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या ३९ व्या “स्मृती दिना” निमित्त साखराळे साखर कारखाना येथे आयोजित कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या सांगली जिल्ह्यातील माजी सैनिकांसह राष्ट्रवादीच्या सैनिक परिवारातील महिला कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे गणपतराव शिर्के, शाहूव्याख्याते ॲड. संभाजीराव मोहिते, युवा नेते प्रतिक दादा पाटील,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन पद नियुक्त्या देण्यात आल्या.
कार्यक्रमा दरम्यान नियुक्ती पूर्वी लोकनेते राजाराम बापूंच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश संघटक कॅप्टन वसंत अजमाने, पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले पाटील, हडपसर अध्यक्ष शहाजी जाधव, चंद्रकांत ढेंबरे आदिंसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली जिल्हा व तालुका पदनियुक्ती, खालीलप्रमाणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी प्रवीण पाटील , सांगली जिल्हा अध्यक्षपदी सचिन बबन ताटे , सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी सुभेदार साहेबराव विठ्ठल शिंदे घाटनांद्रे यांची निवड करण्यात आली.
तसेच वाळवा तालुकाध्यक्ष पदी बाळकृष्ण सावंत, उपाध्यक्ष पदी नायब सुभेदार अशोक शामराव पाटील, वाळवा तालुका संघटक पदी हवालदार हंबीरराव माने, सहसंघटक पदी हवालदार जयसिंग माने, संपर्कप्रमुख पदी शिवाजी पवार, वाळवा तालुका संपर्कप्रमुख पदी सुभेदार सुनील बाबासो पाटील, सहसंपर्क प्रमुख पदी दिलीप केवळकर, सहसंघटक पदी सुभाष शिंगारे पदी निवड झाली निवडीनंतर वरिष्ठ नेत्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.