चिंचवड ः- साहित्य संवर्धन समिती पिंपरी चिंचवड शहर या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना साहित्यिकांनी चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली. यावेळी मुक्त पत्रकार प्रदीप गांधलीकर म्हणाले.. “पूर्वीच्या काळी पत्रकारिता कठीण होती. इथल्या साहित्य संस्था लेखी बातमी अन् फोटो जोडून घेऊन जायचे विजय भोसले यांच्याकडे. ते बातम्या स्वीकारीत असत. उत्तम संस्कार बातमीवर करून देत असत. एक सत्यवादी विचाराचा पत्रकार आपल्यातून गेला आहे. अनेक तरुण पत्रकारांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.”
कवी लेखक सुभाष चटणे म्हणाले… पूर्वी पिंपरी चिंचवड शहरात वृत्तपत्रांची अनेक कार्यालय झाली. पत्रकार जनतेची सुख दुःखे लिहू लागले. पण विजय भोसले यांनी “सत्य परेशान हो सकता है मगर झुक नहीं सकता” अशी पत्रकारिता केली.
साहित्य संवर्धन समितीचे सचिव सुहास घुमरे म्हणाले… “माझी पहिली कविता वृत्तपत्रात पत्रकार विजय भोसले यांनी प्रकाशित केली. त्यामुळे मी कवी आहे हे साऱ्यांना कळले.”
साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले..”सच्चाई झुक नहीं सकती कभी बनावटके असुलोंसे..” अशा धाटणीचे लेखन करणारे ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले आपल्यातून गेले आहेत. समितीच्या कार्याध्यक्ष शोभा जोशी, प्रशांत वाघमारे, सागर कांबळे हे यावेळी उपस्थित होते.
कवी नंदकुमार कांबळे यांच्या पत्नी कै. अर्चना कांबळे, साहित्यिक शरद काणेकर यांच्या मातोश्री श्रीमती मालती काणेकर यांना साहित्य संवर्धन समितीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.