पिंपरी (दिनांक : २४ जानेवारी २०२३)ः- लायन्स क्लब इंटरनॅशनल, प्रांत ३२३४ डी-२ च्या वतीने दिनांक ३० जानेवारी ते ०३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत कृत्रिम पायरोपण जयपूर फूट आणि स्वयंचलित हात यांचे मोफत वाटप करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर पुणे शहराबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील भोसरी, निगडी, चिंचवड या ठिकाणी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० या वेळेत घेतले जाणार आहे. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्या व्यक्तींनी विविध कारणांनी अथवा अपघातात हात, पाय गमावले आहेत किंवा ज्या व्यक्तींचे कारखान्यात अथवा शेतात काम करताना कोपऱ्यापासून हात गमावले आहेत त्यांना सेन्सरसह मशीन ऑपरेटेड कृत्रिम हात पुरविण्यात येणार आहेत. यासाठी शिबिरात येणाऱ्या गरजू व्यक्तींच्या हाताचे आणि पायाचे माप अगोदर घेण्यात येईल. दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रांतपाल राजेश कोठावदे आणि डिस्ट्रिक्ट चेअरमन (जयपूर फूट) राजेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू व्यक्तींना जयपूर फूट आणि कृत्रिम हातांचे वितरण वाय. सी. एम. हॉस्पिटल, वल्लभनगर, पिंपरी येथे करण्यात येणार आहे. तपासणी आणि मोजमाप यासाठीचा तपशील खालीलप्रमाणे :-
१) सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० वाय. सी. एम. हॉस्पिटल, वल्लभनगर, पिंपरी, पुणे.
२) मंगळवार, दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० साईनाथ हॉस्पिटल, संतनगर, पुणे – नाशिक रस्ता, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड, पुणे.
३) बुधवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० हॅप्पी जॉईंट क्लिनिक, ऑफिस नं. ४०२, ४था मजला, मॅजेस्टिक सिटी, वीव्ह बिल्डिंग, अप्सरा थिएटरसमोर, कुमार पॅसिफिक जवळ, सेवन लव चौक, गुलटेकडी, पुणे.
४) गुरुवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० वेदान्त हॉस्पिटल, जी ब्लॉक, चिंचवड एम. आय. डी. सी. रोटरी क्लबसमोर, थरमॅक्स चौक, संभाजीनगर, चिंचवड, पुणे.
५) गुरुवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० मोरया हॉस्पिटल, चापेकर चौक, पीएमपीएमएल बस स्टॉप समोर, चिंचवड, पुणे.
गरजू व्यक्तींबरोबरच सर्व सेवाभावी संस्था यांनी गरीब लोकांशी संपर्क साधून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन लायन राजेंद्र काळे (संपर्क क्रमांक – ९८२२५२८९४९) यांनी केले आहे.