चिंचवड : महाराष्ट्रातील दोन जागांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कसबापेठ मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. यातच चिंचवडच्या पोटनिवडणुकीची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.
रावेत येथील माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या नावाची नागरिकांमधून आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे. गेली अनेक वर्षांचा राजकीय अनुभव असणारे मोरेश्वर भोंडवे हे दोनदा नगरसेवक आहेत. 2012 आणि 2017 च्या राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले आहेत.
2019 च्या निवडणूकीत भाजपच्या लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात सर्व पक्षांनी राहूल कलाटे यांना पाठिंबा असतांना रावेत, किवळे या भागातून सर्वात जास्त मते मोरेश्वर भोंडवे यांनी मिळवून दिली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे. याआधी सुद्धा चिंचवड विधानसभा निवडणुक त्यांनी लढवली आहे. त्यामुळे त्यांना याचा अनुभव आहे.
मोरेश्वर भोंडवे हे राष्ट्रवादीकडून चिंचवड विधानसभा निवडणुकीत इच्छुक असून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. जनतेशी असणारा थेट संपर्क आणि विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासणारा नेता आणि तगडा अनुभव अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत मोरेश्वर भोंडवे यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता दिसत आहे.