पिंपरी : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी (दि. २५) चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट दिली. त्यांनी जगताप कुटुंबाचे सांत्वन केले.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राज्यभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी सांत्वन केले. बुधवारी सायंकाळी पाच वाजता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, लहान बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप व कुटुंबातील इतर सर्व सदस्यांची विचारपूस करत सांत्वन केले. तसेच आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यासोबत राजकारणाच्या माध्यमातून आलेला संपर्काची आठवण करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) नेत्या चंद्रकांत सोनकांबळे, शहराध्यक्ष स्वप्नि कांबळे, कुणाल वाव्हळकर, बाळासाहेब भागवत, सुरेश निकाळजे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *