पिंपरी :- भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजे ‘किसान कृषीप्रदर्शन’. हे कृषीप्रदर्शन १४ ते १८ डिसेंबर दरम्यान पुण्यात ‘मोशी’ येथे आयोजित करण्यात आले असून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती नोंदविली आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे.
मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशानुसार मा. उपसंचालक भूमी अभिलेख पुणे व मा. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार नगर भूमापन अधिकारी पिंपरी चिंचवड यांचे कार्यालयामार्फत माहिती कक्ष स्थापन करून शेतकऱ्यांना भूमी अभिलेख खात्यामधील नवीन योजनांची माहिती पुस्तिका नगर भूमापन अधिकारी पिंपरी चिंचवड उमेश झेंडे यांनी दिली.
राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी ई-पिक पाहणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा एक पेरा या ई-पिक पाहणी राज्यस्तरीय अमलबजावणी कक्षाकडे यावेळी विशेष लक्ष वेधले. या किसान कृषी प्रदर्शनात भूमि अभिलेख विभागामार्फत ई- महाभूमी अंतर्गत राबविण्यात येणारे इतर महत्त्वकांक्षी प्रकल्प ई महाभूमी मोहिमेबद्दल माहिती दिली. ई-मोजणी, ई-नोंदणी, ई-अभिलेख, ई-फेरफार, ई-चावडी, ई-भूलेख, ई-पुनमोजणी,ई-नकाशा, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना यावेळी देण्यात आली. नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील परिरक्षण भूमापक आप्पासाहेब चिखलगी, मंजिरी पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आपण सर्वांनी किसान कृषी प्रदर्शनातील स्टॉल नं 247 भूमी अभिलेख स्टॉल ला 18 डिसेंबर पर्यंत भेट देऊन भूमी अभिलेख विभागाविषयी ची सखोल माहिती घ्यावी असे आव्हान भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.