मा. नगरसेवक तुषार हिंगे यांच्या विशेष प्रयत्नातून मोरवाडी म्हाडा व सम्राट चौक येथील महावितरण विभागातर्फे उभारण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर हटवण्यास यश..
पिंपरी :- मोरवाडी परिसर हा दाट वस्तीचा लोकसंख्या असलेला भाग ओळखला जातो जास्त प्रमाणात रहदारी या भागात वापरले जाते येथे अद्यापही अंडरग्राउंड केबल झाले नव्हते तसेच चौका चौकात मोठमोठे ट्रांसफार्मर स्ट्रक्चर्स व मोठमोठ्या विद्युत केबल याचा धोका सामान्य नागरिकांना होऊ शकतो या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा करून स्मार्ट सिटीच्या धरतीवर अंडरग्राउंड महावितरण केबल व ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग चे काम मंजूर करण्यात आले आहे.
या कामासाठी निधी उपलब्ध नव्हता तरी सातत्याने पाठपुरावा करून निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून या कामासाठी सुमारे तीन कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरात लवकर या संदर्भातील सर्व कामकाज चालू होणार असून अनेक वर्षांची समस्या दूर होणार आहे.
सदर कामकाजामध्ये एच.टी. व एल.टी. केबल लाईन टाकण्यात येणार आहे.
