पिंपरी, दि. ११ : पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने यावर्षी पासून दिला जाणारा भा. वि. कांबळे जीवन गौरव पुरस्कार वयोवृद्ध पत्रकार हेमंत जोगदेव यांना जाहीर करण्यात आला आहे.. पाच हजार रूपये रोख, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.. मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज ही घोषणा केली.. यावेळी परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव नाना कांबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, बाळासाहेब ढसाळ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, सेक्रेटरी प्रवीण शिर्के, सोशलमिडीया अध्यक्ष सुरज साळवे, अनिल भालेराव, अविनाश आदक, माधुरी कोराड, सीता जगताप, अर्चना मेंंगडे, मुुुझ्झफर इनामदार, राम बनसोडे आदि उपस्थित होते..

हेमंत जोगदेव आज ९४ वर्षांचे आहेत.. त्यांनी क्रीडा पत्रकार म्हणून केसरीमध्ये दीर्घकाळ पत्रकारिता केली.. क्रीडा पत्रकारितेला बाप माणूस अशी त्यांची ओळख होती.. एक तत्त्वनिष्ठ पत्रकार असलेल्या हेमंत जोगदेव यांनी क्रीडा क्षेत्रावर दहा पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली.. ऑलेम्पिया येथे भेट देऊन आल्यानंतर त्यांनी “ऑलेमपिक्सच्या उगमाशी” हे पुस्तक लिहिले.. क्रीडा पत्रकारिता हे त्यांचे पुस्तक देखील नव्या पिढीतील क्रीडा पत्रकारिता करणारया पत्रकारांसाठी मार्गदर्शक आहे..

आजही त्यांचं लेखन सुरू असते.. एस.एम देशमुख यांनी दूरध्वनीवरून हेमंत जोगदेव यांचे अभिनंदन केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *