पिंंपरी :- दापोडी गावांत श्री विठ्ठल तरुण मंडळ, खालची आळी द्वारे सकाळी 5 ते 7.30 पर्यंत काकडा आरती चे आयोजन करण्यात आले होते.
ह.भ.प. सुरेश सदाशिव काटे यांनी या काकड्या चे आयोजन केले होते. या मध्ये गावातील महिला, लहान मुले व जेष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. मंदिरात तुळजाभवानी आई चा देखावा करण्यात आला होता. यावेळी गावातील पाचंगे कंपनीने देवीचा जागरण गोंधळ सादर केला. यावेळी भक्तांना प्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भक्तिमय वातावरणात पांडुरंगाची सेवा करण्यात आली. पांच देवांच्या आरत्या, भक्तिगीते व देवीच्या गोंधळाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
यावेळी विश्वस्त हभप. शिवाजी काटे, हभप अशोक काटे, हभप बाळासाहेब बाप्रे, हभप प्रसाद काटे, हभप सत्यवान काटे, हभप राजेंद्र काटे, हभप सचिव काटे व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काटे आदी उपस्थित होते.
