YCM हॉस्पिटल येथे दोन्ही गट आमने-सामने
झिंझुर्डे गटाला पुरावे नष्ट केल्याचा संशय…
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघामध्ये अनेक दिवस झाले खडाजंगी सुरू आहे. कर्मचारी महासंघाच्या मेडिकल वरून चिंचवडे व झिंझर्डे गटात वाद होऊन YCM हॉस्पिटल येथे शनिवारी (दि.२३) त्याचे रूपांतर बाचाबाचीत झाले. प्रकरण पिंपरी पोलिस स्टेशनला गेल्यावर दोन्ही गटाला समज देण्यात आली.
मिळालेल्या माहिती नुसार, चिंचवडे गट ऑडिट करुन मेडीकलचा ताबा विद्यमान अध्यक्षाकडे देणार आहे. परंतू YCM येथील मेडिकल मध्ये कामाला असलेल्या सुप्रिया ढाने या महिलेवर रेमडेसिविर इंजेक्शन मध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप होते. ती महिला तेथे आल्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा संशय आला होता. ही महिला आल्यामुळे विरोध झाला व दोन्ही गटात बाचाबाची झाल्यावर प्रकरण पिंपरी पोलिस स्टेशनला गेले.
पोलिसांनी दोन्ही गटाला समज दिली. ऑडिटला विरोध नाही. परंतू कोर्टाने दिलेल्या आदेशात ऑडिट करावे असा उल्लेख नाही त्यामुळे त्या महिलेकडून कॉम्प्युटर मधील डाटा नष्ट ही केल्या जाऊ शकतो. त्यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली असा आरोप झिंझुर्डे गटाचे अभिमान भोसले व विजय आठवल यांच्याकडून करण्यात आला आहे.
कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार १ ऑगस्ट पर्यंत विद्यमान अध्यक्षाकडे मेडिकलचा ताबा सोपवणार आहोत, असे माजी अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी सांगितले.