पिंपरी : शिवसेनेचे माजी नगरसेवक मधुकर बाबर (वय-७२) यांचे आज पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.
शिवसेनेचे दिवंगत खासदार गजानन बाबर आणि माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांचे ते भाऊ होते. शिवसेनेचे शहर प्रमुख योगेश बाबर यांचे ते वडील होते.
सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना निरामय रुग्णालयात दाखल केले पण तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी चार वाजता निगडी येथील स्मशानात त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काळभोरनगर येथील राष्ट्रतेज सार्वजनिक गणेश मंडळ, जिजामाता पतसंस्था आणि गजानन लोकसेवा सहकारी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. शहरातील सर्व प्लॅस्टिक उद्योगजकांचे संघटन करुन समस्या मांडण्याचे काम त्यांनी केले.