ताथवडेतील झोपडपट्टी, छोटे व्यावसायिकांचे प्रथम पुनर्वसन करा; अन्यथा महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्याध्यक्ष भगवानराव वैराट यांचा आंदोलनाचा इशारा…
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरातील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील अशोक नगर, ताथवडे येथे गेल्या 50 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टी व छोट्या व्यवसायिकांवर कारवाईस कडाडून विरोध कायम आहे. कारवाईची नोटीस बेकायदेशीर असून, प्रथम झोपडीधारकांचे पुनर्वसन करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्याध्यक्ष भगवानराव वैराट यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेस दिला आहे. त्या अनुषंगाने झोपडपट्टी सुरक्षा दल व पथारी सुरक्षा दल या दोन्ही फलकांचे अनावरण भगवानराव वैराट यांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आले.
या वेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे शहराध्यक्ष हरिभाऊ वाघमारे, नाना थोरात, अण्णा लकडे, प्रमिला ठोंबरे, मोहम्मद शेख, काशिनाथ गायकवाड, सुनील भिसे, प्रा. सुरेश धिवार, वामन कदम, सुभाष गलांडे, रमेश चांदणे, अशोक कळसाईत, चंद्रशेखर पिंगळे, अर्जुन दाखले, बबन काळे, सुनील पवार, गौतम लोंढे, विलास थोरात, मुकुंद चंदनशिवे, मिलींद भिसे, शरद किशोर पवार, अशोक कळसाईत, ज्ञानेश्वर कुंभार, अशोक वाघ, सोमनाथ नवले, महेंद्र दाखले, राजु चांदणे, नलिनी कुंभार, प्रियंका कळसाईत, पुष्पा लकडे, बबिता चांदणे, संगीता लकडे, देवयानी थोरात, मधुरा आरसुळ, अंजना शिंदे, सरिता सुखदेवी, संगीता केदार, गायत्री आरसुळ आदी रहिवाशी व छोटे व्यावसायिक उपस्थित होते.
वैराट यांनी राज्यातील गोरगरीब झोपडपट्टी मधील जनतेसाठी नेहमीच शासन दरबारी आंदोलन उपोषण व पत्रव्यवहार करून राज्यातील झोपडपट्टी मधील जनतेसाठी राज्यभर लढा उभारला आहे. यावेळी वैराट यांनी ताथवडेतील झोपडपट्टी बाबत विविध प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच झोपडपट्टीतील नागरिकांना न्याय मिळवून देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.