जिल्हा कार्यकारिणीच्या आदेशावरून संघातील बंडखोरांची हकालपट्टी ; रिक्त झालेल्या पदांवर नवनियुक्ती
पिंपरी : पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये संघाची नवीन कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. यावेळी संघातील बंडखोर पदाधिकारी व सदस्यांची पदावरून हकालपट्टी करत त्या रिक्त झालेल्या पदांवर नवनियुक्ती करत कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला.
मराठी पत्रकार परिषदेच्या आदेशावरून पुणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक पुण्यामध्ये आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, परिषद प्रतिनिधी एम जी शेलार, जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, समन्वयक सुनील जगताप, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया जनार्दन दांडगे, पिं. चिं. पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघातील बंडखोर व फीतूर लोकांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघात थारा नसून त्यांना पुन्हा पत्रकार संघात न घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
दरम्यान काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पत्रकार संघात बंडखोर निर्माण झाले व त्यांनी आपला वयक्तिक संघ स्थापन केला. या गंभीर घटनेची दखल घेत वरिष्ठांच्या आदेशानुसार या बंडखोर सदस्य व पदाधिकाऱ्यांची संघातून हकालपट्टी करण्यात आली तसेच यापुढे त्यांना संघाच्या कुठल्याही कामकाज प्रक्रियेत सामावून न घेण्याचे आदेश देण्यात आले.
पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या आदेशावरून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अरूण (नाना) कांबळे व बाळासाहेब ढसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्त झालेल्या पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. नवीन कार्यकारिणीवर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची कार्यकारणी पुढील प्रमाणे :-
अध्यक्ष – अनिल वडघुले
कार्याध्यक्ष – अरूण (नाना) कांबळे
उपाध्यक्ष – रोहीत खरगे
उपाध्यक्षा – माधुरी कोराड
उपाध्यक्ष – तुळशीदास शिंदे
उपाध्यक्ष – दिलीप देहाडे
महिला अध्यक्षा – शबनम सय्यद
सोशल मिडीया अध्यक्ष – सुरज साळवे
सरचिटणीस – प्रवीण शिर्के
चिटणीस – अजय कुलकर्णी
सहचिटणीस – रामदास तांबे
खजिनदार – विनायक गायकवाड
सहखजिनदार – अविनाश आदक
प्रवक्ता – प्रशांत साळुंखे
समन्वयक – मारुती बानेवार
जिल्हा प्रतिनिधी – प्रवीण कांबळे
अंतर्गत हिशोब तपासणीस – दत्तात्रय कांबळे
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती – अनिल भालेराव
कार्यकारणी सदस्य :- प्रमोद गराड, दीपक साबळे,
सिताराम मोरे, विश्वजीत पाटील, सागर बाबर, देवा भालके, गणेश मोरे, सुनील पवार, रेहान सय्यद, महावीर जाधव, विशाल जाधव, मदन जोशी, राकेश पगारे
मुख्य सल्लागार – बाळासाहेब ढसाळ