पिंंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरात केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक ठिकाणी विकास कामे चालू आहेत व काही ठिकाणी विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. अशा वेळेस महानगरपालिकेच्या वतीने कचरा कुंडी मुक्त शहर करण्याचा संकल्प केला, स्तुत्य उपक्रम आहे, यासाठी महापालिकेने इंदौर शहराच्या धर्तीवर आपल्या शहरात कचरा कुंडीमुक्त होण्यासाठी शहराचा दौरा केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गाजावाजा करून शहर कचराकुंडी मुक्त झाल्याचे जाहीर केले,दिवसातुन अवेळी केव्हाही गाडी येते परंतु नागरिकांना एकदा घंटागाडी येऊन गेल्यानंतर, वेळेत न टाकता आल्यामुळे तो कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न निर्माण होतो, आणि कचराकुंड्या काढल्यामुळे नागरिक ,आटीयन्स  ,व्यवसायिक ,नोकरदार यांना घंटागाडी च्या वेळेत कचरा टाकता येत नाही. यामुळे रात्री व पहाटे बरेच व्यवसायिक व नागरिक मिळेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात ,यामुळे सकाळी मॉर्निंग वाकला जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो .

मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीची शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी मागणी केली आहे की दिवसभरातून दोनदा गाड्या उपनगरात द्याव्यात ,जेणेकरून नागरिकांना आपल्या वेळेतही कचरा टाकता येईल , कांकरिया गॅस गोडाऊनच्या  कडेला चौकात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा साठला जातो, शिवाय तेथे कचरा असल्यामुळे मोकाट कुत्रे पशुपक्षी कचऱ्यावर येथेच्न ताव मारतात,नागरिकांना सकाळी चालने ही कठीण झाले आहे.पिंगळे गुरव येथील आरोग्य निरीक्षक, उद्धव ढवरी यांनी सकाळी पहाटे वेळी व रात्री उशिरा कर्मचाऱ्यांना थाबवून कचरा कुढीच्या ठिकाणी गुलाबाचे फुल देऊन गाधिगिरी करून  प्रभोधन करून दोन्ही  कुंढया काढल्या त्यामुळे मयूर नगरी जवळील परीसर स्वच्छ झाला.

कांकरिया गँस गोडावून जवळील चौकात पण रस्त्यावर कचरा साठलेला आसतो,आरोग्य निरीक्षक कांबळे भिमराव याना सांगितले असता फक्त काढु म्हणून सांगतात. त्यांनी ही प्रभोधन करून दररोज कचरा लवकर  उचलण्याची  मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने शहराध्यक्ष अण्णा जोगदंड  महिला अध्यक्षा मीना करंजावणे महिला अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष संगीता जोगदंड, गजानन धाराशिवकर, मुरलीधर दळवी,अँड सचिन काळे, रामराव दराडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *