पिंपरी, :- अनुसूचित जाती कल्याण समितीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट देऊन अनुसूचित जातीविषयी असलेल्या विविध कामकाजाचा आढावा घेतला.

समिती प्रमुख कु.प्रणिती शिंदे यांच्यासह आमदार यशवंत माने, लहू कानडे, राजेश राठोड, लखन मलिक, अरुण लाड, सुनील कांबळे आणि टेकचंद सावरकर या समिती सदस्यांनी अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष, मागासवर्गीयांसबंधी राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबत माहिती घेतली. समितीसमवेत अवर सचिव सीमा तांबे, कक्ष अधिकारी पवन म्हात्रे आदींचा समावेश होता. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी समितीच्या सदस्यांचे महापालिका भवन येथे स्वागत केले. उपेक्षित समुहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी मनापासून सकारात्मक काम करावे, अशी अपेक्षा समितीने यावेळी व्यक्त केली.

पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या आढावा बैठकीस समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, सह शहर अभियंता रामदास तांबे, संदेश चव्हाण, उप आयुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, संदीप खोत, विठ्ठल जोशी, ढोले, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, वामन नेमाणे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप आदी उपस्थित होते.

महापालिकेच्यावतीने राबवण्यात आलेल्या नाविण्यपूर्ण योजना आणि उपक्रम यांचे संगणकीय सादरीकरण अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केले. जिजाऊ क्लिनिक, आधुनिक डाॅग पाॅण्ड, डाॅग पार्क, ईव्ही चार्जींग स्टेशन, इको वाॅकिंग ट्रॅक, मियावाकी उद्यान, सेवन डी तंत्रज्ञानाने युक्त बालमनोरंजन केंद्र, बर्ड व्हॅली येथील म्युझिक फाऊंडेशन, व्हाॅट्स अॅप चॅटबोट, ओरिसा माॅडेल प्रमाणे आदर्श शाळा विकसित करणे, फुड कोर्ट विकसित करणे, विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्र आदींबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *