पिंपरी :- महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या सदस्यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन पद्मभूषण समाजसेवक आण्णा हजारे यांना त्यांच्या जन्मदिनी (दि.१५ जून २०२२) पिंपरी चिंचवडच्या बहिणाई ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांच्या हस्ते “जय जवान जय किसान” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, शिवाजीराव शिर्के, मनोहर दिवाण, तानाजी एकोंडे, राजेंद्र वाघ, सुरेश कंक,सुभाष चव्हाण,शामराव साळुंखे, आण्णा गुरव, दीपक चांदणे, निशिकांत गुमास्ते, पांडुरंग दोडके, जयश्री गुमास्ते उपस्थित होते.
