पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहराला अॅनिमिया मुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर शहरात “मिशन अक्षय” मोहिम सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कार्यरत असणाऱ्या महापालिका अधिकारी आणि कर्मचारी तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत “हिमोग्लोबिन तपासणी” शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. शैलजा भावसार, डॉ. सुनिता साळवे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका, पत्रकार आदी उपस्थित होते.
