नवी दिल्ली : देशभरात गॅसदरवाढीची झळ बसलेल्या नागरिकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. स्वयंकाप घरातील एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे.
केंद्र सरकारने अबकारी कर (एक्साईज ड्यूटी) कमी केल्याने देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे. पेट्रोलवरचा अबकारी कर 8 रुपये तर डिझेलवरचा अबकारी कर 6 रुपयांनी कमी करत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.
पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 6 रुपयाने कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. तशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे. त्यामुळे देशवासियांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर घरगुती गॅससाठीही केंद्र सरकारकडून 200 सबसिडीची घोषणा करण्यात आली आहे.