मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस भवन मुंबई येथील कार्यालयात दिनांक १९ मे २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या प्रदेश कार्यकारणी व काही जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना.मा.अजितदादा पवार साहेब, ग्रहमंत्री ना. मा. श्री. दिलीपजी वळसे पाटील साहेब, राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा मा. विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मा. श्री. शिवाजीराव गर्जे साहेब, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

तसेच याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. दिपक गणपतराव शिर्के, प्रदेश सरचिटणीस श्री. बाबासाहेब जाधव यांच्या सहीने नियुक्ती पत्र खालील माजी सैनिकांना देण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री. पोपटराव पडवळ, प्रदेश संघटक पदी कॅप्टन शेषराव काळवाघे, प्रदेश सह-संघटक तातेराव मुंडे, प्रदेश सह-संपर्क प्रमुख सुधीर शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य साहेबराव खळदकर, कोंकण विभाग प्रमुख प्रदीप विनायक डावकर, पुणे शहर संघटक वसंत अजमाणे, शिरूर तालुका अध्यक्ष अर्जुन दसगुडे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर देशमुख , पुणे जिल्हा अध्यक्ष राजाराम धुमाळ, बुलढाणा जिल्हा सरचिटणीस मधुकर पवार, भोकरदन तालुका अध्यक्ष रवींद्र दांडगे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख माणशिंग भगत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य व उपाध्यक्ष वामन जंजाळ, पुणे जिल्हा संघटक शिवाजीराव कदम, प्रदेश चिटणीस आप्पासाहेब कांबळे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख रवींद्र देसाई, औरंगाबाद विभाग (मराठवाडा) प्रमुख गफार पठाण, अ. नगर (दक्षिण) जिल्हाध्यक्ष पांडुरंग शिरसाट, सातारा जिल्हाध्यक्ष विलास देशमुख, सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण नलावडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य व मुंबई शहर उपाध्यक्ष, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव दगडे, पुणे जिल्हा सरचिटणीस सुरेश उमाप, पुणे शहर उपाध्यक्ष अजित काटे, बारामती तालुका अध्यक्ष हनुमंत निंभाळकर, पुणे शहराध्यक्ष अविनाश माणिकराव ढोले पाटील, बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रभाकर देशमुख, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष बन्सी दांडगे, जालना जिल्हाध्यक्ष अंकुश वराडे, शिरूर तालुका सरचिटणीस भाऊसाहेब सोनवणे आदी माजी सैनिक पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
यावेळी अजितदादांसह मान्यवरांनी सर्व नवनियुक्त माजी सैनिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व भावी कार्यास शूभेच्छा दिल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *