भाजप नेत्या चित्राताई वाघ यांच्यासह असंख्य महिलांचा सहभाग…
पिंपरी (प्रतिनिधी) :- पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच आरंभ सोशल फाउंडेशनच्या वतीने धुलिवंदनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी ‘रंगवर्षा २०२२’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी भाजप नेत्या चित्राताई वाघ उपस्थित राहिल्या. तसेच, शहरातील विविध श्रेत्रातील महिलांनी धुलिवंदनानिमित्त रंग खेळण्याचा आनंद लुटला.
आरंभ सोशल फाउंडेशनच्या वतीने माजी उपमहापौर तुषार हिंगे आणि सोनाली हिंगे यांच्या माध्यमातून धुलिवंदनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी ‘रंगवर्षा 2022’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. खास मराठी गाण्यावर ठेका धरत महिलांनी होळीचा आनंद लुटला. या कार्यक्रमात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही हजेरी लावली. महिलांसमवेत रंग खेळत धुलिवंदन साजरे केले.
या कार्यक्रमात माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, वैशाली काळभोर, वैशाली अजित गव्हाणे, अपर्णा राजू मिसाळ, तृृष्णा अमित गावडे, पुजा कुणाल लांडगे, अनुश्री हर्षल ढोरे यांच्यासह पोलिस, वकिल, डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील महिला सहभागी झाल्या. असंख्य महिलांनी रंगवर्षा कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद लुटला. या बद्दल सर्वांचे आयोजक सोनाली तुषार हिंगे यांनी आभार मानले.