पिंपरी :- मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त- एस. एम. देशमुखसर यांच्या आदेशावरून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी प्रविण शिर्के, खजिनदारपदी विनय लोंढे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीपदी अनिल भालेराव, सदस्य अजय कुलकर्णी या निलंबित पदाधिकारी यांची सन्मानाने नियुक्ती करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिके मधील भा.वि.कांबळे पत्रकार कक्षात अध्यक्ष- अनिल वडघुले यांच्या मार्ग दर्शनाखाली नुकत्याच झालेल्या सभेमध्ये वरील विषयास सर्वानुमते मान्यता देत निलंबित पदाधिकाऱ्यांना आहे त्या पदावर सन्मान करुन पुर्ववत नियुक्त करण्यात आले आहे.
मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त- मा. एस.एम. देशमुखसर यांच्या मार्गदशनाखाली मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांच्या समवेत सुनील लोणकर, सुनील नाना जगताप आणि सोशल मिडीया परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी नुकतीच पिंपरी चिंचवड पत्रकार संघास भेट दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या चार सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला गेला होता.. हा निर्णय व्यक्तीगत राग, लोभातून, गैरसमजातून घेतल्याचे आणि तो निर्णय घेताना जिल्हा संघाला विश्वासात घेतले गेले नव्हते.. या चार सदस्यांचे निलंबन रद्द करण्यात येऊन त्यांना पुन्हा त्यांच्या पदावर घेण्याचे आदेश देण्यात आले होते.
संघाच्या दैनंदिन कामकाजात परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकारयांनी लक्ष घालण्याची गरज नाही. तसेच पत्रकार संघटना बळकट करणे हे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे.. त्यादृष्टीने कामकाज व्हावे.. कोणाचेही आणि कोणतेही गैरकृत्य किंवा संघटनेच्या हिताला बाधा आणणारे कृत्य खपवून घेतले जाणार नाही.. संघाचे कामकाज परिषदेने घालून दिलेल्या नियमानुसारच चालेल याची नोंद घ्यावी असेही सांगितले आहे.
यावेळी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष-अनिल वडघुले, नानासाहेब कांबळे, सोशल मिडिया अध्यक्ष- सुरज साळवे, अनिल भालेराव, बापू गोरे, बाबू कांबळे, प्रविण शिकेँ, विनय लोंढे, दादाराव आढाव, माधुरी कोराड, मारूती बाणेवार, दिलीप देहाडे, कलींदर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आभार सुरज साळवे यांनी मानले.