पिंपरी :- भारत देशामध्ये पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केल्यामुळे तळवडे, रुपीनगर, सहयोग नगर प्रभाग क्र.०१ मधील भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून वंदे मातरम चौक, रुपीनगर येथे १० मार्च रोजी सायंकाळी ७:०० वाजता विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचा विजय असो, “वंदे मातरम”, “देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो” अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी नागरिकांना लाडू वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर यांनी बोलत असताना भारतीय जनता पक्षाने देशांमध्ये झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये चार राज्यांनी घवघवीत यश संपादित केल्याचे वक्तव्य केले. भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष किरण पाटील यांनी प्रभाग क्र.०१मधील सर्व नागरिक व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी उत्तर प्रदेश मध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केल्यामुळे 2024 चा लोकसभा निवडणुकांमध्ये निश्चितपणे यश संपादन होईल अशी ग्वाही दिली.

शांताराम (बाप्पू) भालेकर याप्रसंगी बोलत असताना भारत देशामध्ये या पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या मध्ये चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन करून संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारल्याचे निदर्शनास आणून दिले. भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून चार राज्यांतील जनतेने विश्वास दर्शविल्याचे वक्तव्य केले. आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर गोव्याचे प्रभारी पदाची जबाबदारी दिली, आणि ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गोव्यातील म्हापसा मतदार संघातील जबाबदारी आपल्या जवळचा विश्वासू सहकारी भोसरी विधानसभेचे दमदार आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्याकडे सोपविली ती जबाबदारी सुद्धा आमदार महेश दादांनी यशस्वीरित्या पार पाडून देवेंद्रजी फडणवीस यांचा विश्वास सार्थ ठरविला.

रुपीनगरचे माजी नगरसेवक रघुनंदन घुले यांनी आपले समारोपनचे भाषण करत असताना उत्तर प्रदेश,उत्तराखंड मणीपूर आणि गोवा या चारही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केल्यामुळे प्रभाग क्र.०१ मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला, हनुमान मंदिर ते वंदे मातरम चौक येथे आनंदोत्सवाची भव्य पदयात्रा काढण्यात आली व वंदे मातरम चौकामध्ये लाडू पेढे वाटप करून समारोप करण्यात आला, रघुनंदनजी घुले यांनी आपल्या भाषणामध्ये उत्तर प्रदेश व उत्तराखंड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या दोन्ही राज्यात एका पक्षाची सत्ता दुसऱ्यांदा कधी आली नव्हती पण यावेळी इतिहास घडला असे वक्तव्य केले.

शितलताई वर्णेकर, अस्मिताताई भालेकर, स्वातीताई कासार, शितलताई सलढाणा, धनंजय वर्णेकर सर, रमेशशेठ भालेकर, शिरीषभाऊ उत्तेकर, अनिलशेठ भालेकर, शिवाजी आप्पा बोडके, दादा सातपुते, विक्रम हिवरे, महादेव कासार, मोहनआप्पा शेवाळे, चेतन तळपे मयूर बोडके, चंद्रशेखर फरांदे, पठाण शेट्टी, सुखदेव म्हस्के, जमीर मुल्ला,भागवत खेडकर, साईनाथ ढाकणे,सोमनाथ मेमाने,बाळासाहेब भालेकर, बबन भालेकर,रामदास कुटे, संतोष शिंदे, सचिन वाडकर, विलास अबुज,अविनाश सूर्यवंशी, दत्ता चव्हाण, सचिन गायकवाड, शकील शेख, प्रदीप जयसवाल,खानसाहेब, अभिजीत गिरी, स्वप्निल वाघमारे, निलेश भालेकर,अक्षय रासकर, तोसिफ मुलानी, शुभम सदानंद, सागर भोसले,सागर लोळगे, प्रतीक सोनवणे, आकाश कांबळे, कृणाल पाटील, ऋषभ पाटील, वैभव खोडवे, रणजित कांबळे, अभिषेक वर्णेकर, केतन पाटील, मंगेश नेरकर, दिनेश गौर, सचिन भालेकर, बाजीराव मुंडे, श्रीयश भालेकर, अनिल माने, संतोष कींजलकर हे कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शितलताई वर्णेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *