पिंपरी :- मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांचे वडील देवडी गावचे माजी सरपंच कै. माणिकराव देशमुख यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. दि.९ रोजी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाने एस. एम. देशमुख सरांची त्यांच्या गावी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष-अनिल वडघुले, उपाध्यक्ष-प्रवीण शिर्के, सोशल मीडिया अध्यक्ष- सुरज साळवे, दैनिक पवना समाचारचे संपादक- नाना उर्फ अरुण कांबळे, पत्रकार हल्ला मुक्तीचे साप्ताहिक काय चाललय?चे संपादक- अनिल भालेराव व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कै. माणिकराव देशमुख यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी देवडी गावाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.