पिंपरी :- पिंपरी येथील ऑटो क्लस्टर येते राष्ट्रीय औद्योगिक सप्ताहाची सांगता अनेक आस्थापनातील कामगारांना सुरक्षितेची प्रात्यक्षिके, माहितीपत्रके,चित्रफित दाखवून माहिती देण्यात आली. यावेळी डॉ. शरद जोशी त्यांनी सांगितले की औद्योगिक सुरक्षितता ही जबाबदारी कोणाची? असा प्रश्न करत ते म्हणाले की ही जबाबदारी सांघिक आहे .अपघात म्हणजे स्वतःला स्वतःसाठी करून घेतलेला घात. म्हणजेच कामगारांना धोक्याची घंटा ओळखता आली पाहिजे, कामात आत्मविश्वास नसावा, विश्वास असावा. 29 प्रकारचे अपघात हे दुर्लक्ष केल्यामुळे होतात आणि यामुळे मृत्यू ही होतो ,तर तीन हजार प्रकारचे अपघात जीवित हानी नाही, वित्त हानी नाही असे असल्याचे डॉक्टर शरद जोशी यांनी सांगितले.
इंडस्ट्री सपोर्टचे अध्यक्ष नंदकिशोर जगदाळे यांनी सांगितले की स्वतःची वर्तणूक पण अपघातास कारणीभूत असते, स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल तर काम करण्यापूर्वी आपल्याला काय काम करावयाचे त्याचे नियोजन केले पाहिजे, कामाची माहिती घेतली पाहिजे आणि नवनवीन तंत्रज्ञान आपण अवगत करून स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे असे मत व्यक्त केले. डायनोमर्क कंट्रोलचे मानव संसाधन प्रमुख सूर्यकांत मुळे यांनी असे म्हटले की आपल्याकडे आयोजन प्रयोजन, प्रयोजन, नियोजन नसेल तर दुर्घटना होणारच. मानवाने मानवा साठी व्यवस्था केली पाहिजे. सुरक्षीतेकडे गांभीर्याने बघितले पाहिजे असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक करताना गुणवंत कामगारांना जोगदंड यांनी सांगितले की 4 मार्च 1966 पासून भारतात राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करीत आलो आहोत, पण 1990 च्या अगोदर मेकॅनिझमचे जग होते, 1990 नंतरचे जग हे ऑटोमोबाईल हे जग आहे .स्वतःमध्ये बदल करा, स्वतःला सुरक्षित राहून इतरांना सुरक्षित ठेवण्याचा सल्ला त्यांनी कामगारांना दिला.
यावेळी राजेंद्र भक्ते यांनी ध्वनि-चित्रफिती द्वारे सर्वांना आपल्या विनोदी शैलीतुन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये भोसरीतील अनेक आस्थापना सहभागी झाल्या होत्या त्याचबरोबर डायनोमर्क कंट्रोलच्या सर्व कामगारांनी प्रशिक्षणात जास्तीत जास्त सहभाग नोंदवला. यावेळी डॉ,शरद जोशी, आयोजक नंदकिशोर जगदाळे गुणवंत कामगारांना जोगदंड, केतकी राऊत, राजेंद्र भक्ते, तसेच जयंत राऊत हे मान्यवर उपस्थित कार्यक्रम यशस्वीतेसाठी ईश्वर सोनोने, पंडीत वनसकर रोहित चिंचनसुरे, प्रिया देशमुख यांनी परिश्रम घेतले.