अनिताताई संदीप काटे आणि निलेश काटे युवा मंचच्या वतीने आयोजन…

चिंचवड, ८ मार्च – अनिताताई संदीप काटे आणि निलेश काटे युवा मंचच्या वतीने पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन परिसरात ‘हॅपी स्ट्रीट पिंपळे सौदागर २०२२’ या उपक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पिंपळे सौदागरकरांनी फुल टू धमाल करत आनंद घेतला. यामध्ये लहानांबरोबरच मोठ्यांसाठी झुम्बा, योगा, करमणूक, लाईव्ह म्युझिक, क्रीडा कलाकार, ड्रमसेट म्युझिक, सर्व प्रकारचे खेळ, केक कटिंग, ट्याटू, स्केटिंग, आर्ट अँड क्राफ्ट, बालजत्रा, विविध खेळ, सायकलिंग, ध्यानधारणा, व्यायाम आणि नृत्य असे अनेक उपक्रम या रस्त्यावर आयोजित करण्यात आले होते. नागरिकांनी याचा मनमुराद आनंद घेतला.

आरजे पवन भोजवानी हे यावेळी विशेष आकर्षण ठरले. झुम्बा’चे सदस्यांनी पिंपळे सौदागरकरांसोबत सामूहिक नृत्य आणि फिटनेसबाबत जनजागृती केली. कार्निव्हलच्या मुख्य भागातील मंचावर मुलांसाठी चॉक आर्ट, पपेट शो, जादूचे प्रयोग तर कार्निव्हलमध्ये सहभागी झालेल्या तरुण – तरुणींना त्यांचे कलागुण दाखवण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. मुख्य म्हणजे, एरवी वाहनांनी व्यापलेल्या या रस्त्यावर पायी चालण्याचा आनंद नागरिकांना घेता आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मौज- मजेचा आनंद लुटला. अनिताताई संदीप काटे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *